आमदार संपर्क कार्यालयात कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST2021-05-25T04:20:04+5:302021-05-25T04:20:04+5:30

शासनाच्या वतीने सुरू केलेल्या तीनही कोविड सेंटरमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी दररोज भोजन व्यवस्थेची कामगिरी या कोरोनायोद्ध्यांकडून केली जात ...

Coronation warriors felicitated at MLA Liaison Office | आमदार संपर्क कार्यालयात कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

आमदार संपर्क कार्यालयात कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

शासनाच्या वतीने सुरू केलेल्या तीनही कोविड सेंटरमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी दररोज भोजन व्यवस्थेची कामगिरी या कोरोनायोद्ध्यांकडून केली जात आहे. कोरोनायोद्धा शिवसैनिकांच्या या कामगिरीची दखल घेत २३ मे रोजी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नांवदर, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, अरविंद देशमुख आदींची उपस्थिती होती. आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी भोजनाची सुविधा करण्यात आली आहे. सकाळ आणि संध्याकाळ या दोनवेळा भोजन देण्याचे व्यवस्थापन अनिल डहाळे, नवनीत पाचपोर करीत आहेत. कार्यक्रमास गटनेते चंदू शिंदे, विशू डहाळे, संभानाथ काळे, उद्धव मोहिते, मारोती तिथे, राहुल खटिंग यांच्यासह कोरोनायोद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Coronation warriors felicitated at MLA Liaison Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.