शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : परभणीत सोमवारपासून निर्बंध लागू: दुकाने चारपर्यंतच सुरू राहणार; शनिवार, रविवार बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 14:41 IST

Corona virus : राज्य शासनाने परभणी जिल्ह्याचा तिसऱ्या गटात समावेश केला आहे. परिणामी कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देसर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सर्व दिवशी दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. दुध विक्री केंद्रे, दुध संकलन केंद्र, दुध वितरण केंद्र सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत सुरू

परभणी: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा प्लस रूग्ण आढळून येत असल्याची बाब विचारात घेऊन राज्य शासनाच्या सूचनेनुसार २८ जूनपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी काढले आहेत. यापुढे प्रत्येक शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेण्याचे आदेशित करण्यात आले आहे. (  Restrictions in Parbhani from Monday ) 

जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमालीची घटली असली तरी डेल्टा प्लसचे रूग्ण राज्यात विविध ठिकाणी आढळून येत आहेत. शिवाय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्य शासनाने परभणी जिल्ह्याचा तिसऱ्या गटात समावेश केला आहे. परिणामी कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी याबाबत आदेश काढला आहे. 

त्यानुसार २८ जूनपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील. शनिवार व रविवार ही दुकाने बंद राहतील. रेस्टॉरंट पाच दिवस ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. सुट्टीच्या दिवशी फक्त पार्सल सुविधा सुरू ठेवण्याची परवानगी आहे. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरण्यास सकाळी ५ ते ९ पर्यंतच परवानगी राहणार आहे. शासकीय कार्यालयासहीत इतर कार्यालयातील कर्मचारी उपस्थिती ५० टक्केच सुरू ठेवण्याचे आदेशित केले आहे. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, विविध बैठका, सभा यांना ५० टक्के क्षमतेसह परवानगी आहे. लग्न संमारंभास फक्त ५० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असून अंत्यविधीला २० जणांनाच उपस्थित राहण्यास परवानगी आहे. 

कृषी व कृषी पुरक सेवा आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. व्यायामशाळा, केश कर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर यांना ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था तसेच खासगी ट्रॅव्हल्स यांना ३ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सिनेमा गृह व नाट्यगृह बंद ठेवण्याचे आदेश आहेत. खेळाची मैदाने पाच दिवस सकाळी ५ ते९ पर्यंत आणि सायंकाळी ६ ते ९ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. शनिवार व रविवार ही मैदाने बंद राहणार आहेत. त्या ठिकाणी कामगारांना राहण्याची सुविधा आहे, त्या ठिकाणची बांधकामे दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी ५ ते सकाळी ६ पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

नियमित काय सुरू...सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सर्व दिवशी दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. दुध विक्री केंद्रे, दुध संकलन केंद्र, दुध वितरण केंद्र सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. तसेच खासगी वाहने, टॅक्सी, लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवाशांना आंतरजिल्हा प्रवेश यास परवानगी आहे; परंतु स्तर पाच मधून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना इ-पास बंधनकारक राहणार आहे. कोविड नियमांचे पालन करून एमआयडीसी पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्या