शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

आवलगाव येथील सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:17 IST

४० वर्षांची परंपरा असलेल्या या सप्ताहास ३१ जानेवारी रोजी प्रारंभ झाला.झाली होती. ७ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. ज्ञानोबा माऊली ...

४० वर्षांची परंपरा असलेल्या या सप्ताहास ३१ जानेवारी रोजी प्रारंभ झाला.झाली होती. ७ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. ज्ञानोबा माऊली मुडेकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप झाला. पारायणप्रमुख म्हणून ह.भ.प. ज्ञानोबा महाराज शेळगावकर यांनी जबाबदारी सांभाळली. ह.भ.प. सूर्यभान महाराज आवलगावकर यांनी भागवत कथा निरुपन केले.

सप्ताह दरम्यान दशरथ महाराज अंभोरे (चारठाणा), भरत महाराज जोगी (परळी वैजनाथ), एकनाथ महाराज हारसदकर (लोहा), धनंजय महाराज मोरे (नाशिक), काशिनाथ महाराज माने (फुलकळस), एकनाथ महाराज माने (वांगी), विश्वांभर महाराज कोल्हे (आळंदी) या कीर्तनकारांची कीर्तने झाली. ५१ जणांनी ज्ञानेश्वरी पारायण केले.

दररोजच्या कीर्तनात उध्दवबुवा पांचाळ, अशोकबुवा धोंडगे यांनी गायनाची तर तुकारामबुवा पांचाळ, केशवबुवा पांचाळ, कालिदास धोंडगे, पुरूषोत्तम पांचाळ, वैभव महाराज, मकरध्वज धोंडगे, पवन धोंडगे यांनी मृदंगाची साथ दिली. बंडू धोंडगे यांनी चोपदाराची भूमिका पार पाडली.

शेवटच्या दिवशी सकाळी सुर्यभान महाराज यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात गावातून दिंडी मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत उद्धव महाराज व बालिकाताई यांनी उत्कृष्ट गौळणी, अभंग सादर करून उपस्थित भाविकांची मने जिंकत दिंडीमध्ये चांगलाच रंग भरला. अनेक भाविकांनी भजन व नृत्य करीत आणि फुगड्या खेळत दिंडीत आनंद लुटला. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. संपूर्ण सप्ताहात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी सर्व गावकर्‍यांनी खूप परीश्रम घेतले.