जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले कोविड सेंटरवर जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:18 IST2021-05-11T04:18:12+5:302021-05-11T04:18:12+5:30
बाजार समितीच्या वतीने शहरातील वालूर रस्त्यावरील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहात उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मुगळीकर हे ...

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले कोविड सेंटरवर जेवण
बाजार समितीच्या वतीने शहरातील वालूर रस्त्यावरील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहात उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मुगळीकर हे सोमवारी शहरात आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी बळिराजा मोफत कोरोना केअर सेंटरला भेट दिली. त्यावेळी सेंटरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे जेवण सुरू होते. जेवणाच्या मेनूमध्ये हापूस आंब्याचा रस, बेसण, पापडी, चपाती व भात असा मेनू होता. संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे यांनी जिल्हाधिकारी मुगळीकर यांना जेवणाचा आग्रह केला असता तो त्यांनी तत्काळ मान्य करीत चक्क कोविड सेंटर परिसरातील लिंबाच्या झाडाखाली बसून जेवणाचा आस्वाद घेत बळिराजा कोविड सेंटरमधील जेवणाची स्तुती केली. खरं तर कोविड सेंटरच नाव जरी घेतले तर भल्याभल्याची भंबेरी उडते. परंतु, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोविड सेंटरमध्ये जेवणाचा यथेच्छ आस्वाद घेतला. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे राज्यउपाध्यक्ष छगन शेरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सर्जेराव लहाने, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, जि. प. सदस्य अशोक काकडे, पवन आडळकर, रणजित गजमल, रामराव मैफल, रामराव गायकवाड, अविनाश शेरे, गोविंद काष्टे, रामेश्वर शेरे, शशांक टाके, वसंत बोराडे, पांडुरंग कावळे, रमेश गीते, जयराम तांगडे, आदींची उपस्थिती होती.