सेलूत शिक्षकांच्या दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 16:41 IST2018-04-09T04:57:29+5:302018-04-09T16:41:45+5:30

शहरातील एका खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली़

Clashes in two groups of Sailu Teachers | सेलूत शिक्षकांच्या दोन गटांत हाणामारी

सेलूत शिक्षकांच्या दोन गटांत हाणामारी

सेलू (जि. परभणी) : शहरातील एका खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली़ या प्रकरणी रात्री उशिरा परस्परविरोधी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील एक आरोपी वगळता, अन्य सर्वांना अटक केली आहे़

शहरातील एका शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या विजय शिवाजी टेकाळे आणि गजानन रामराव ढाकरे या दोन शिक्षकांमध्ये शनिवारी सकाळी शाळेतच वाद झाला होता़ शाळा सुटल्यानंतर हा वाद तुंबळ हाणामारीपर्यंत पोहोचला़ शाळेपासून काही अंतरावरील एका मैदानावर शिक्षकांचे दोन्ही गट भिडले. त्यानंतर गजानन ढाकरे यांच्या फिर्यादीवरून विजय टेकाळे, श्याम टेकाळे, राजेभाऊ कºहाळे यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संस्थाचालक डॉ़ संजय लोंढे यांच्यासह गजानन ढाकरे, डाखोरे, घोगरे, कपाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून लोंढे वगळता अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Clashes in two groups of Sailu Teachers