गुरुवार आणि शुक्रवारी जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST2021-05-26T04:18:17+5:302021-05-26T04:18:17+5:30
या वर्षीच्या उन्हाळ्यात वारंवार अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे. सध्या शेतशिवारामध्ये खरीप हंगामाची ...

गुरुवार आणि शुक्रवारी जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता
या वर्षीच्या उन्हाळ्यात वारंवार अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे. सध्या शेतशिवारामध्ये खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. अशातच मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने २७ मे रोजी परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात तर २८ मे रोजी परभणी, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात वाऱ्याचा वेग प्रतिताशी ३० ते ४० किलोमीटर राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, झाडाच्या आडोशाला उभे राहू नये, पशुधनास निवाऱ्याच्या जागी बांधावे, झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नये, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवाच्या वतीने करण्यात आले आहे.