मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मानवत येथे चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 17:01 IST2018-07-28T17:01:20+5:302018-07-28T17:01:55+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मानवत येथे चक्काजाम आंदोलन
मानवत (परभणी ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकानी आज बंदची हाक दिली होती. यामुळे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी रस्तावर टायर जाळून वाहने रोखून धरली.
यासोबतच मानवत रोड व देवलगाव (आवचार) या ठिकाणीही रस्तारोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील सावळी येथे रस्तावर झाडे टाकून मानवत- पाळोदी रस्ता रोखण्यात आला होता. दरम्यान, मोंढा परिसरात दोन आडत दुकान व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर अज्ञाताने दगडफेक केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दिनकर यांनी शहरभर चोख बंदोबस्त ठेवला.