मेडिकल कॉलेजसाठी आता ‘चक्का जाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:22 IST2021-09-14T04:22:20+5:302021-09-14T04:22:20+5:30

येथील बी. रघुनाथ सभागृहात १३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता खा. बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षिय नेत्यांची बैठक घेण्यात ...

Chakka Jam for Medical College | मेडिकल कॉलेजसाठी आता ‘चक्का जाम’

मेडिकल कॉलेजसाठी आता ‘चक्का जाम’

येथील बी. रघुनाथ सभागृहात १३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता खा. बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षिय नेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी पालकमंत्री नवाब मलिक यांना सर्वपक्षिय शिष्टमंडळ भेटणार असून, त्यांच्याकडे शासकीय मेडिकल कॉलेजची मागणी केली जाणार आहे. त्याच दिवशी परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, असे ठराव सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावयाचे असून, ते ठराव तहसीलदारांमार्फत शासनाला सादर केेले जाणार आहेत. त्यानंतर २१ सप्टेंबरला तालुक्याच्या ठिकाणी 'चक्का जाम' आंदोलन केले जाणार आहे. २ ऑक्टोबरपासून सलग ९ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले जाणार आहे.

या बैठकीस खा. बंडू जाधव यांच्यासह आ. सुरेश वरपुडकर, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. डॉ. राहुल पाटील, माजी आ. सुरेश देशमुख, रिपब्लिकन सेनेचे विजय वाकोडे, माजी महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर भगवान वाघमारे, ‘लाल बावटा’चे काॅ. किर्तीकुमार बुरांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, मोहम्मदी फाउंडेशनचे सय्यद खादर, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, नगरसेवक अतुल सरोदे, सचिन देशमुख, टिका खान, वासिम भाई, बाळासाहेब फुलारी, गोविंद अजमेरा, धोंडी खाकरे, पप्पू वाघ, अरुण चव्हाळ, महेश पाटील, रामप्रसाद रणेर, प्रदीप भालेराव, सुभाष माने आदींची उपस्थिती होती.

Web Title: Chakka Jam for Medical College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.