सिमेंट बंधारा गैरसोयीचा ठरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST2021-03-25T04:17:14+5:302021-03-25T04:17:14+5:30
विनापरवाना दारू वाहतूक वाढली पाथरी: तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री करण्याच्या उद्देशाने होणारी विनापरवाना दारू वाहतूक तालुक्यात ...

सिमेंट बंधारा गैरसोयीचा ठरतोय
विनापरवाना दारू वाहतूक वाढली
पाथरी: तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री करण्याच्या उद्देशाने होणारी विनापरवाना दारू वाहतूक तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अवैध दारू विक्री करणार्यांना मोकळे रान सुटले आहे. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.
वादळी वाऱ्याने पिकांचे नुकसान
सेलू: अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे ज्वारी व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुका महसूल प्रशासनाने या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
वर्षभरात २ हजार ५०० रुग्णांचे उद्दिष्ट
परभणी : शासनाने क्षयरोग मुक्तीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांनाही क्षय रोग रुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. वर्षभरात जिल्ह्यात २ हजार ५०० रुग्णांचे उद्दिष्ट आहे.
महागाईच्या भडक्याने नागरिक त्रस्त
परभणी : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबरोबरच गोडेतेलाचा भावही वधारल्याने नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. गोडतेल प्रतिकिलो १५० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील भाववाढीने नागरिक आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
झरी-आसेगाव रस्त्याची दुरवस्था
झरी : रस्त्याच्या मधोमध झालेल्या असंख्य खड्ड्यांमुळे झरी ते आसेगाव रस्त्याची पूर्णत: चाळणी झाली आहे. परिणामी वाहन धारकांना, प्रवाशांना आदळ आपट करीत प्रवास करावा लागत आहे. दुसरीकडे झरी ते साडेगाव फाट्यापर्यंत कंत्राटदाराने रस्त्यांवर गिट्टी अंथरली आहे.
पाणी पातळीवर होणार परिणाम
सेलू : तालुक्यातील दुधना नदीच्या पात्रातील वाळू उपशामुळे मोरेगाव, राजवाडी, वालूर, काजळी रोहिणी व गावांतील पाणी पातळीवर परिणाम होऊन पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण होत आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कृत्रिम वाळूचा जिल्ह्यात वापर वाढला
परभणी : वाळूचे दर गगनाला भिडलेले असल्याने इमारत, रस्ते व पुलाच्या बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा वापर जिल्ह्यात वाढला आहे. मात्र, दुसरीकडे खासगी व शासकीय कामांवर कृत्रिम वाळूचा वापर वाढल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.