शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
5
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
6
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
7
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
8
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
9
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
10
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
11
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
12
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
13
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
14
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
15
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
16
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
17
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
18
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
19
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सेवाभावी संस्थेत थाटला पत्त्याचा क्लब; ४४ जण पोलिसांच्या ताब्यात, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 17:31 IST

सेलू शहरातील कृष्ण नगर भागात साई सेवाभावी संस्थानच्या खोल्यांमध्ये पत्त्याचा क्लब सुरू होता.

देवगावफाटा (परभणी) : सेलू शहरातील कृष्णनगर परिसरात साई सेवाभावी संस्थेच्या दोन बंद खोल्यात सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर ९ मे रोजी रात्री ७.१५ च्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली असून, त्यात ४४ जणांना ताब्यात घेतले आहे. रोख साडेतीन लाख रुपये, ५ चारचाकी, १२ दुचाकी असा सुमारे २५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहेत.

सेलू शहरातील कृष्ण नगर भागात साई सेवाभावी संस्थानच्या खोल्यांमध्ये पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अश्वीनकुमार यांना मिळाली. पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सोमवारी रात्री ७.१५ वाजता धाड टाकली. त्यावेळी दोन खोल्यांमध्ये रूममध्ये गोलाकार टेबलवर तिर्रट नावाचा जुगार सुरू होता. पोलिसांनी रोख ३ लाख ४२ हजार रुपयांसह ४४ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर परिसरातील ५ चारचाकी वाहने,१२ दुचाकी वाहने जप्त केले आहेत. 

ताब्यात घेतलेल्या ४४ आरोपींचे आधार कार्ड व इतर माहिती पोलिसांनी रात्रभरात मिळविली. त्यानंतर हा क्लब विनोद रामचंद्र पवार हे चालवित असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यावरुन पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या फिर्यादीवरुन ४५ जणांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. विनोद पवार यास पोलीसांनी मंगळवारी अटक केली.

परजिल्ह्यातीलही आरोपींचा समावेशया कारवाईत पोलिसांनी ४४ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील आरोपींसह बीड, लोणार, किनवट, जालना, परतूर, मंठा, पुणे आदी ठिकाणच्या आरोपींचा समावेश आहे. तसेच कारवाई करण्यात आलेल्या ४४ जणांमध्ये शहरातील ४ व्यापारी ,१ लाकडी मिल चालक,१ ट्रान्सपोर्ट व्यावसायिक,१ सेवानिवृत्त, ८ मजूर, २ हमाल,१ सलून चालक, १ खाजगी वाहन चालक आणि १५ सधन शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

सर्वात मोठी कारवाईसेलू शहरात पोलिसांनी केलेली ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. यापूर्वी तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी ८ जुलै २०२१ रोजी सातोना रोडवरील एका मनोरंजन केंद्रावर ३९ आरोपींविरुद्ध कारवाई केली होती. त्यावेळी ३ लाख ८८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी