दिव्यांगांची परभणीत हेळसांड सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:14 IST2021-04-03T04:14:14+5:302021-04-03T04:14:14+5:30
शस्त्रक्रियेअभावी रुग्णांची गैरसोय सुरू परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील निजामकालीन इमारतीत कार्यरत असलेले मुख्य शस्त्रक्रियागृह मागील १५ दिवसांपासून बंद ...

दिव्यांगांची परभणीत हेळसांड सुरूच
शस्त्रक्रियेअभावी रुग्णांची गैरसोय सुरू
परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील निजामकालीन इमारतीत कार्यरत असलेले मुख्य शस्त्रक्रियागृह मागील १५ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे रुग्ण कल्याण समितीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्यांना रेफर केले जात आहे.
२०० मशीन दुरुस्तीअभावी पडून
परभणी : येथील एसटी महामंडळाच्या पाथरी, जिंतूर, गंगाखेड या आगारातील २०० ईटीआय मशीन दुरुस्तीअभावी मुंबई येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाकडे पडून आहेत. त्यामुळे वाहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने लक्ष देऊन मशीनची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
‘ग्रामसडक योजनेची चौकशी करा’
परभणी : तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र बहुतांश ठिकाणी कामात अनियमितता आढळून येत आहे. त्यामुळे चौकशी करावी, अशी मागणी भांबरवाडी, मुळीच्या ग्रामस्थांनी केली आहे.
काम पूर्ण होण्या आधीच उखडला रस्ता
गंगाखेड : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काम पूर्ण होण्याआधीच डांबरीकरण झालेला रस्ता उखडला आहे. त्यामुळे नागठाणा पाटी ते सुनेगाव या रस्त्याची चौकशी करून संबंधित कंत्राटदाराकडून या रस्त्याचे काम पुन्हा करून घ्यावी, अशी मागणी नागठाणा ग्रामस्थांनी केली आहे.
गंगाखेड शहरावर पाणीटंचाईचे सावट
गंगाखेड : शहराजवळ धारखेड परिसरात गोदावरी नदीपात्रात साठलेले पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आगामी एप्रिल महिन्यात शहरवासीयांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी
गंगाखेड : शहरातील रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्याविरुद्ध नगरपालिका प्रशासनाने कारवाई करावी, अशी शहरवासीयांतून केली जात आहे. नागरिक बाजारपेठ व शहरातील फिरताना साेशल डिस्टन्सलाही फाटा देत असल्याचे शुक्रवारी दिसून आले.
इंधनदरवाढीने वाहनधारक त्रस्त
गंगाखेड : पेट्रोल दरवाढीचा चढता आलेख कायम राहत असल्याने इंधन दरवाढीने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. साध्या पेट्रोलने शंभरी पार केल्याने वाहनधारकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होताना दिसून येत आहे.