अडीच लाखांच्या गुटख्यासह कार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:18 IST2021-03-23T04:18:19+5:302021-03-23T04:18:19+5:30
परभणी शहरातील इकबालनगर भागात एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. त्यावरून रविवारी ...

अडीच लाखांच्या गुटख्यासह कार जप्त
परभणी शहरातील इकबालनगर भागात एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. त्यावरून रविवारी रात्री १० च्या सुमारास इकबालनगर येथे संबधित ठिकाणी धाड टाकली असता पांढऱ्या रंगाच्या एमएच ०४ जीबी ४२१९ या क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये विविख कंपन्यांचा २ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा गुटखा दिसून आला. या कारच्या नंबर वरून केलेल्या तपासअंती ही कार शेख फारुख अहेमद यांची दिसून आली. यावेळी पोलिसांनी २ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा गुटखा व कार जप्त केली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी रमेश किशनराव मुजमुले यांच्या फिर्यादीवरून शेख फारुख अहेमद याच्या विरूद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.