गंगाखेड तहसील कार्यालयावर बांधकाम व्यवसायिक-कामगारांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 18:14 IST2018-12-17T18:13:32+5:302018-12-17T18:14:42+5:30
बंद अवस्थेत असलेले वाळू धक्के सुरू करावे या मागणीसाठी शहरातील बांधकाम व्यवसायिक व कामगारांनी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

गंगाखेड तहसील कार्यालयावर बांधकाम व्यवसायिक-कामगारांचा मोर्चा
गंगाखेड (परभणी ) : गेल्या वर्षभरापासुन बंद अवस्थेत असलेले वाळू धक्के सुरू करावे या मागणीसाठी शहरातील बांधकाम व्यवसायिक व कामगारांनी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
तालुक्यातील वाळूचे धक्के गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत आहेत. यामुळे येथे बांधकामे बंद पडली असून यामुळे बांधकाम व्यवसायिक, गवंडी व मजुर यांच्या कामावर गदा आली आहे. यामुळे येथील वाळू धक्के सुरु करण्याची मागणी व्यवसायिक व कामगारांनी आज तहसीलवर मोर्चा काढून केली. यावेळी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले.
मोर्चात राज मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिस खान, शेख उस्मान, शेख रियाज, साजीद अली, शेख फयाज, शेख कलीम, सय्यद अफजल, शेख सद्दाम, रहेमत भाई, शेख आयाज, शेख अजीम, सय्यद अमेर, शेख रईस, शेख वसीम, सय्यद मतीन, शेख अल्ताफ, शेख मोबीन, सय्यद असलम, शेख मुखीद, शेख अफजल, शेख खिजर, सय्यद कलीम, शेख मोहंमद, सय्यद बब्बू आदींचा सहभाग होता.