गरीब विद्यार्थ्यांसाठी लिहिले पुस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:18 IST2021-04-01T04:18:03+5:302021-04-01T04:18:03+5:30
परभणी : गरीब मुलांना इंग्रजीचे ज्ञान सोप्या भाषेत अवगत व्हावे या उद्देशाने मानवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका ...

गरीब विद्यार्थ्यांसाठी लिहिले पुस्तक
परभणी : गरीब मुलांना इंग्रजीचे ज्ञान सोप्या भाषेत अवगत व्हावे या उद्देशाने मानवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका मसरत फातिमा इलियास अली खान यांनी ‘आय लव टू रीड’ या पुस्तकाचे लिखाण केले आहे.
मागील एक वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत. या काळात विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जात आहे. ऑनलाईन शिक्षणाबरोबरच इतर माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकता यावे, या उद्देशाने मानवत येथील जि. प. उर्दू प्रशालेतील शिक्षिका मसरत फातिमा इलियास अली खान यांनी ‘आय लव्ह टू रीड’ या इंग्रजी पुस्तकाचे लिखाण केले आहे. जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते नुकतेच या पुस्तकाचे प्रकाशन झाले. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या या पुस्तकाच्या ४५० प्रती प्रकाशित केल्या असून, लवकरच आणखी प्रती प्रकाशित करून गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वितरण केले जाणार असल्याची माहिती मसरत फातिमा इलियास अली खान यांनी दिली. हे पुस्तक तयार करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी ससाणे यांच्यासह रणमाळ, लोहट यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.