गोदावरी नदीपात्रात तरुणाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST2021-04-05T04:15:50+5:302021-04-05T04:15:50+5:30
खळी पाटीजवळील गोदावरी नदीपात्रात रविवारी तुकाराम कुंडरे हे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मासे पकडत होते. यावेळी त्यांना एक मृतदेह ...

गोदावरी नदीपात्रात तरुणाचा मृतदेह आढळला
खळी पाटीजवळील गोदावरी नदीपात्रात रविवारी तुकाराम कुंडरे हे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मासे पकडत होते. यावेळी त्यांना एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील कुंडलिक सुरवसे यांना दिली. त्यानंतर त्यांनी गंगाखेड पेालिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी तातडीने जमादार रतन सावंत, पोलीस नाईक दत्तराव पडोळे, कृष्णा तंबूड दाखल झाले. त्यांनी अन्य ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अधिक माहिती घेतली असता मयत तरुणाचे नाव मंगेश ऊर्फ गजानन ढोणे (रा. गंगाखेड) असल्याचे समजले. मंगेश याने ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे तपासांती निष्पन्न झाले. याप्रकरणी मयताचे वडील बालाजी धोंडीराम ढोणे यांनी गंगाखेड पोलिसांना माहिती दिली. त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.