दोन युवकांचे मृतदेह विहिरीत आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST2021-04-04T04:17:54+5:302021-04-04T04:17:54+5:30
लक्ष्मण सोनवणे व रंजीत आवटे हे दोघे २ एप्रिल रोजी रात्री शेतात झोपण्यासाठी जातो म्हणून घरातून निघून गेले होते. ...

दोन युवकांचे मृतदेह विहिरीत आढळले
लक्ष्मण सोनवणे व रंजीत आवटे हे दोघे २ एप्रिल रोजी रात्री शेतात झोपण्यासाठी जातो म्हणून घरातून निघून गेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परत आले नाहीत. नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला असता, कोक शिवारातील एका विहिरीतील पाण्यामध्ये चपला तरंगत असल्याचे आढळले. त्यामुळे विहिरीत शोध घेतला तेव्हा दोन्ही युवकांचे मृतदेह आढळून आले. लक्ष्मण सोनवणे हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे तर रंजित आवटे हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे कोक गावामध्ये शोककळा पसरली आहे. दोन्ही मृतदेहांचे बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या युवकांच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.