वाढीव वीजबिल माफीसाठी भाजपचे धरणे आंदोलन; महावितरणच्या प्रवेशद्वाराला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 13:51 IST2021-02-05T13:51:09+5:302021-02-05T13:51:56+5:30
लॉकडाऊन काळातील व त्यानंतरचे वाढीव वीज बिल माफ करण्याची मागणी करत आंदोलकांनी आक्रमक होत महावितरणच्या कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले.

वाढीव वीजबिल माफीसाठी भाजपचे धरणे आंदोलन; महावितरणच्या प्रवेशद्वाराला ठोकले टाळे
गंगाखेड: वाढीव वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी ( दि. ५ ) सकाळी ११ वाजता महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी महावितरण कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकत संताप व्यक्त केला.
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केलेली वीज बिल माफी ग्राहकांना न देता उलट जास्तीचे वाढीव बिल आकारले गेल्याच्या प्रकारचा भारतीय जनता पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन करून निषेध करण्यात आला. लॉकडाऊन काळातील व त्यानंतरचे वाढीव वीज बिल माफ करण्याची मागणी करत आंदोलकांनी आक्रमक होत महावितरणच्या कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. यानंतर आंदोलकांनी विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन उपविभागीय अभियंता दिनेश भागवत यांना सादर करण्यात आले.
कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध कलम ६८, ६९ अन्वये कार्यवाही करून सोडून देण्यात आले. आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, विठ्ठलराव रबदडे, व्यंकटराव तांदळे, नंदकुमार सुपेकर, रामराव फड खादगावकर, तालुकाध्यक्ष कृष्णा सोळंके, शहराध्यक्ष श्रीनिवास मोटे, आदिनाथ मुंडे, हिरा मेहता, गोविंद रोडे, रवी जोशी, रामेश्वर अळनुरे, माणिकराव मोरे, पद्मजाताई कुलकर्णी, महिला आघाडी शहराध्यक्ष रुपालीताई जोशी, संघमित्र गायकवाड, भास्कर जाधव, रोहिदास निरस, सत्यनारायण गव्हाणकर, खुशाल परतवाघ, देवानंद जोशी, प्रकाश लव्हाळे, प्रभाकर लंगोटे, संतोष मुंडे, पप्पू मात्रे, सदानंद पेकम आदींचा सहभाग होता.