वाढदिवस ठरला शेवटचा; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची शेतात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 18:46 IST2021-12-10T18:45:58+5:302021-12-10T18:46:38+5:30

तरुण मागील काही दिवसांपासून औरंगाबादेत राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असे.

The birthday was the last day; competitive exam aspirant young man commits suicide | वाढदिवस ठरला शेवटचा; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची शेतात आत्महत्या

वाढदिवस ठरला शेवटचा; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची शेतात आत्महत्या

मानवत : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका २० वर्षीय युवकाने आज वाढदिवसाच्या दिवशीच आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी झरी येथे घडली. निलेश शिवाजी सत्वधर असे मृत युवकाचे नाव आहे.  

पाथरी तालुक्यातील झरी हे गाव मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. या गावातील निलेश शिवाजी सत्वधर (२०) हा पदवीधर युवक औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. महिनाभरापूर्वी तो गावाकडे आला होता. आज सकाळी १०  वाजता तो झरी शिवारातील स्वतःच्या शेतात गेला. त्यानंतर ११.३० वाजेच्या दरम्यान निलेशचे वडील शिवाजी सत्वधर आणि भाऊ महेश शेतात गेले असता त्यांना निलेशने लिंबाच्या झाडाला साडीने गळफास घेतल्याचे आढळून आले. माहिती मिळताच सपोउनि अशोक ताठे, रोहीत पोतदार घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करून त्यांनी पंचनामा केला. निलेशचा वाढदिवसाच्या होता  

वाढदिवसी केली आत्महत्या 
निलेश मागील काही दिवसांपासून औरंगाबादेत राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असे. आज त्याचा वाढदिवस होता. सकाळी तो शेतात गेला आणि वाढदिवसीचा त्याने आत्महत्या करून स्वतःल संपवल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. निलेशचा भाऊ जीवन सत्वधर यांच्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: The birthday was the last day; competitive exam aspirant young man commits suicide