कृषी प्रक्रिया उद्योगात मोठी संधी : ढवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST2021-03-25T04:17:38+5:302021-03-25T04:17:38+5:30
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थींकरिता ‘शेतमाल ...

कृषी प्रक्रिया उद्योगात मोठी संधी : ढवण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थींकरिता ‘शेतमाल प्रक्रिया लघु उद्योग’ या विषयावर २३ ते २६ मार्च दरम्यान परभणी येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आहे. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. ढवण बोलत होते. कार्यक्रमाला शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके आदींची उपस्थिती होती. यावेळी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले म्हणाले, अन्नधान्य, डाळ आणि अन्य शेतमाल यांच्यावर प्रक्रिया करून आवश्यक पॅकेजिंग केल्यास शेतकऱ्यांना निश्चितपणे अधिक आर्थिक मोबदला मिळतो. संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले, आहारातील चिंच, अद्रक, लसूण यावर प्रक्रिया करून त्यावर आधारित छोटे छोटे उद्योग सुरु करण्यास मराठवाडयात खूप वाव आहे. सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रशिक्षण आयोजक डॉ. स्मिता खोडके यांनी केले. प्रा. मधुकर मोरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रमोदिनी मोरे यांनी आभार मानले.