आता महिनाभर दाढी-कटिंग घरातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:17 IST2021-04-07T04:17:42+5:302021-04-07T04:17:42+5:30
राज्य शासनाला गेल्यावर्षी दुकाने बंद असल्याने मदतीची अनेकदा मागणी केली; परंतु कसल्याहीप्रकारची मदत केली गेली नाही. दुकानाचे भाडे, वीजबिल, ...

आता महिनाभर दाढी-कटिंग घरातच!
राज्य शासनाला गेल्यावर्षी दुकाने बंद असल्याने मदतीची अनेकदा मागणी केली; परंतु कसल्याहीप्रकारची मदत केली गेली नाही. दुकानाचे भाडे, वीजबिल, कामगारांचे पगार, बॅंकेचा हप्ता यासाठी पैसे कोठून आणायचे? त्यामुळे आताही मदत करू नका; परंतु आम्हाला आमचे काम तरी करून द्या.
- संपत सवणे, जिल्हाध्यक्ष, नाभिक महामंडळ
सलून व्यवसायावरच नाभिक समाज बांधवांच्या शेकडो कुटुंबांची उपजीविका चालते. गेल्यावर्षी ७ ते ८ महिने दुकाने बंद असल्याने या संकटातून बाहेर येतो न येतो, तोच पुन्हा दुकान बंदीचे संकट लादण्यात आले आहे. ही अन्यायकारक बाब आहे. शासनाने या गोष्टीचा विचार करावा.
- संतोष जाधव, सलून व्यावसायिक
शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करण्यास आपण तयार आहोत; परंतु दुकाने बंद करू नयेत. दुकाने बंदच करायची असतील, तर सलून व्यावसायिकांना शासनाने जेवढे दिवस दुकान बंद राहील, तेवढे दिवस सानुग्रह अनुदान द्यावे.
भगवान गोरे, सलून व्यावसायिक
जिल्ह्यात एकूूण केशकर्तनालये - २०००
त्यावर अवलंबून असणारे कामगार - ४०००