पुस्तके प्राप्त असताना वाटपास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST2021-09-13T04:17:45+5:302021-09-13T04:17:45+5:30
समग्र शिक्षा अंतर्गत २०२१-२२ या वर्षासाठी परभणी जिल्ह्याला ७० टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. परंतु, शालेय स्तरावर अद्यापही ...

पुस्तके प्राप्त असताना वाटपास टाळाटाळ
समग्र शिक्षा अंतर्गत २०२१-२२ या वर्षासाठी परभणी जिल्ह्याला ७० टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. परंतु, शालेय स्तरावर अद्यापही पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांकडून वारंवार पाठ्यपुस्तकांबाबत विचारणा केली जात आहे. शैक्षिणक सत्र सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र विद्यार्थ्यांना अद्यापही पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तेव्हा ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्राधान्याने पाठ्यपुस्तकांचे वाटप करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अनंता गरुड, लक्ष्मण गारकर, रामेश्वर भोसले, मारोती डोईफोडे, बालाजी गुर्ले, राजू पांचाळ, प्रशांत टाक, अमृत देशमुख, अशोक सिरगदवार, मुकुंद चांदुरकर, प्रवीण चापके, विनोद लांडगे, राम जाधव, अनंदा पुंड, हनुमान कुंडगीर, सुरेश देशमुख, दीपक बारसकर आदींनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.