कोरोना काळातील खर्चाचे ऑडिट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:16 IST2021-05-22T04:16:41+5:302021-05-22T04:16:41+5:30

रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे व इतरांनी यासंदर्भात प्रशासनाला निवेदन दिले आहे. कोरोना निवारणार्थ आतापर्यंत किती खर्च करण्यात ...

Audit Corona period costs | कोरोना काळातील खर्चाचे ऑडिट करा

कोरोना काळातील खर्चाचे ऑडिट करा

रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे व इतरांनी यासंदर्भात प्रशासनाला निवेदन दिले आहे. कोरोना निवारणार्थ आतापर्यंत किती खर्च करण्यात आला याची माहिती प्रसिद्ध करावी, जिल्ह्यात नेमलेल्या विविध समित्यांचा अहवाल व झालेल्या कार्यवाहीची माहिती जाहीर करावी, शहरात जंम्बो कोविड सेंटर उभारणीच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल मनपा आयुक्तांवर कारवाई करावी, रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा व त्याच्या विक्रीचे ऑडिट करावे, दरपत्रक दर्शनी भागात न लावणाऱ्या शहरातील खासगी रुग्णालयांवर कारवाई करावी, शहरातील सर्व आस्थापना निश्चित वेळ देऊन सुरू करण्याची परवानगी द्यावी, आदी ११ मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही विजय वाकोडे, राजकुमार सूर्यवंशी, दीपक ठेंगे, शरद चव्हाण, अनिता सरोदे, आदींनी दिला आहे.

Web Title: Audit Corona period costs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.