मानवत रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँक फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 14:17 IST2020-02-21T13:58:53+5:302020-02-21T14:17:07+5:30
बँकेतील तिजोरी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न

मानवत रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँक फोडण्याचा प्रयत्न
मानवत : तालुक्यातील मानवत रोड येथे असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे .चोरट्यांनी खिडकी तोडून आत प्रवेश करीत बँकेतील तिजोरी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 20 फेब्रुवारी रोजी मध्य रात्री नंतर घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मानवतरोड येथील सेलू कॉर्नरजवळ महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे. सलग तीन दिवस सुटी आल्याने बँकेचे कर्मचारी आपले कामकाज आटपून 20 फेब्रुवारी रोजी बंद करून गेले होते. मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी बँकेच्या भिंतीची खिडकी तोडून आत प्रवेश केला. यानंतर बँकेतील तिजोरीला फोडण्याचा प्रयत्न या चोरट्यांकडून केला गेला असल्याचे दिसून आले. बँकेतील काहीही चोरी गेली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सपोनि शिवाजी पवार, जमदार फारुकी, प्रताप साळवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ञ आणि श्वानपथकाला यावेळी पाचारण करण्यात आले होते.