शेळीला धक्का लागल्याच्या कारणावरून भावंडांना बेदम मारहाण; पूर्णा येथील घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 17:14 IST2018-03-24T17:14:27+5:302018-03-24T17:14:27+5:30

रस्त्यावरील शेळीला दुचाकीचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघा भावंडांना बेदम मारहाण करण्यात आली.

attack on sibling at purna | शेळीला धक्का लागल्याच्या कारणावरून भावंडांना बेदम मारहाण; पूर्णा येथील घटना  

शेळीला धक्का लागल्याच्या कारणावरून भावंडांना बेदम मारहाण; पूर्णा येथील घटना  

पूर्णा ( परभणी) :  रस्त्यावरील शेळीला दुचाकीचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघा भावंडांना बेदम मारहाण करण्यात आली. ही शक्रवारी (दि.२३ ) दुपारी ४ वाजेच्या सुमारास  सिद्धार्थ नगर परिसरात घडली. या प्रकरणी काल रात्री उशिरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एकाची परिस्थिती गंभीर आहे. 

पूर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून विजय नगर येथील रहिवासी मो मुज्जमील मो इरशाद व मो मुस्सदीक मो इरशाद सिद्दीकी हे दोघे भाऊ शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घराकडे जात होते. सिद्धार्थ नगर येथील जमदाडे यांच्या घरासमोरील आले असता त्यांचा दुचाकीचा रस्त्यावरील शेळीला धक्का लागला. यावरून सुबोध कांबळे, भाऊ काळे व अन्य दोघांनी मुज्जमील व मुस्सदीक यास बेदम मारहाण केली. यात दोघेही गंभीर जखमी झाली असून मुस्सदीक याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी मोहम्मद मुद्दसिर याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक सुनिल ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आय.राठोड  करीत आहेत.

 

Web Title: attack on sibling at purna