पाथरी व मानवत तालुक्यातील बैल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 18:33 IST2019-03-06T18:33:23+5:302019-03-06T18:33:41+5:30
आरोपीने ३ बैलजोड्या चोरी प्रकरणात कबुली दिली आहे

पाथरी व मानवत तालुक्यातील बैल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक
परभणी- पाथरी व मानवत तालुक्यातून ३ बैलजोड्या चोरी केल्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथरी येथील एका आरोपीस अटक केली आहे़ ही कारवाई ५ मार्च रोजी करण्यात आली़
पाथरी व मानवत तालुक्यातील खडकवाडी, वाघाळा येथून गतवर्षी तीन बैलजोड्यांची चोरी झाली होती़ या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात २ तर पाथरी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता़ या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पाळत ठेवून पाथरी येथील कुरेशी मोहल्ला येथील आरोपी शकीर अमीरमियाँ कुरेशी (३५) याला शितफीने ताब्यात घेण्यात आले़ त्यानंतर त्याची कौशल्याने सदरील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे़ त्यानंतर आरोपीस पाथरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले़