एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:18 IST2021-04-01T04:18:23+5:302021-04-01T04:18:23+5:30
परभणी जिल्ह्याचे तापमान गेल्या काही वर्षांत उन्हाळ्यात चांगलेच वाढत आहे. यावर्षीही याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी ...

एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप
परभणी जिल्ह्याचे तापमान गेल्या काही वर्षांत उन्हाळ्यात चांगलेच वाढत आहे. यावर्षीही याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी जिल्ह्याच्या तापमानात अचानक वाढ झाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाकडे या दिवशी कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. विशेष म्हणजे स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या संकेतस्थळानेही बुधवारी जिल्ह्याचे तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंद झाल्याचे सांगितले.
बुधवारचे रेकॉर्ड
यावर्षी आत्तापर्यंत जिल्ह्याचे तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले होते.
बुधवारी मात्र या तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.
असा राहील पंधरवडा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार १० एप्रिलपर्यंत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार १, ३, ४, ५, एप्रिल रोजी ४० अंश सेल्सिअस, २ रोजी ३९, ५ ते ९ व १३ एप्रिल रोजी ४१ अंश सेल्सिअस आणि १०, ११, १२ व १४ एप्रिल रोजी ४२ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.