रस्त्यावरील हातगाडे चालकांची अँटिजन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST2021-05-08T04:17:27+5:302021-05-08T04:17:27+5:30
कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हा प्रशासनाच्या वतीने परभणी शहरात ३ ते ७ मेपर्यंत कडक संचारबंदी जाहीर करण्यात ...

रस्त्यावरील हातगाडे चालकांची अँटिजन टेस्ट
कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हा प्रशासनाच्या वतीने परभणी शहरात ३ ते ७ मेपर्यंत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता किराणा दुकाने, फळे, भाजी विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास प्रतिबंध करण्यात आला. मात्र असे असतानाही शहरातील वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक यांचा पुतळा परिसर, शिवाजीनगर, काळी कमान, खानापूर फाटा, दर्गा रोड, आपना कॉर्नर, क्रांती चौक, गांधी पार्क, गव्हाणे चौक या भागांत सर्रासपणे हातगाडीवाले आपली हातगाडी रस्त्यावर उभे करून फळे, भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. याबाबत प्रशासनाच्या वतीने वारंवार व्यवसायिकांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र हातगाडीवाल्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून आपला व्यवसाय सुरू ठेवला होता. त्यामुळे शुक्रवारी रस्त्यावर उभ्या असलेल्या हातगाडी चालकांची टेस्ट करण्याची कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली. शुक्रवारी दिवसभरात ५० ते ६० हातगाडी चालकांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. या वेळी उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, तहसीलदार संजय बिराजदार, नायब तहसीलदार श्रीरंग कदम यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईने शहरातील हातगाडी चालकांमध्ये खळबळ उडाली होती.