जयंतीनिमित्त शोभायात्रा, कार्यक्रमांना परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:43+5:302021-04-06T04:16:43+5:30
परभणी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक संदेश देणारी शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ...

जयंतीनिमित्त शोभायात्रा, कार्यक्रमांना परवानगी द्या
परभणी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक संदेश देणारी शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रीय सण म्हणून साजरी केली जाते. यावर्षीही हा सण साजरा करण्याचा निर्धार सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पुढाकाराने पार पडलेल्या समस्त जयंती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन न करता, सॅनिटायझर, मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे पालन करण्यात येणार आहे. तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी सामाजिक संदेश देणारी शोभायात्रा आणि विविध विधायक उपक्रम राबविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सिद्धार्थ हत्तीअंबिरे, गौतम मुंढे, बी.एच. सहजराव, आकाश लहाने, सुधीर कांबळे, उमेश लहाने आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे.