agitation to postpone recruitment with Maratha reservation | मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती देण्यासाठी सामूहिक मुंडन आंदोलन

मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती देण्यासाठी सामूहिक मुंडन आंदोलन

मानवत : मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती द्या, या मागण्यासाठी सोमवारी (ता 21)सकल मराठा समाजाने नगरपालिका समोर सामूहिक मुंडन आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधले. आंदोलनानंतर समाजाच्या वतीने नगरपालिका ते महाराणा प्रताप चौकापर्यंत फेरी काढण्यात आली. यावेळी नोकरी भरतीला स्थगिती द्यावे, फलक हातात घेऊन मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.


तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने एका पाठोपाठ आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जात आहे 19 सप्टेंबर रोजी मानवत बंदची हाक देण्यात आली होती.या बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा जाहीर केला होता.यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. एक दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर मराठा समाजाच्या वतीने 21 सप्टेंबर रोजी  सकाळी 11 वाजता नगरपालिके समोर सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुंडन करून घोषणाबाजी केली. या आंदोलनानंतर नगरपालिका ते महाराणा प्रताप चौकापर्यंत सकल मराठा समाज बांधवांनी फेरी काढली. या फेरीत सकल मराठा समाज बांधव मराठा आरक्षणाची स्थगिती उठवा, महाराष्ट्र सरकारने नोकर भरतीला स्थगिती द्यावी, अशा विविध मागण्यांचे फलक आपल्या हातात घेऊन लक्ष वेधले.या आंदोलनात प्राचार्य केशव शिंदे, प्रा .अनुरथ काळे,मुख्याध्यापक बालाजी गजमल,लक्ष्मण साखरे,उद्वव हारकाळ,प्रा.मोहन बारहाते, ॲड.सुनील जाधव,अनिल जाधव,संतोष गलबे,गोविंद घांडगे, हनुमान मस्के,दशरथ शिंदे,सूरज काकडे ,प्रा.किशन बारहाते,राजेभाऊ होगे,कृष्णा शिंदे,सुनील कापसे,शुभम शिंदे आदी उपस्थित होते. पो नि उमेश पाटील सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पवार, पो उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: agitation to postpone recruitment with Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.