आर्वी येथील उपकेंद्राला बाधित रुग्णाने ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:18 IST2021-04-04T04:18:10+5:302021-04-04T04:18:10+5:30
परभणी तालुक्यातील आर्वी येथे आज जवळपास १०० जणांना कोरोना संसर्ग होऊन यातून ग्रामस्थ बरे झाले आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत ...

आर्वी येथील उपकेंद्राला बाधित रुग्णाने ठोकले कुलूप
परभणी तालुक्यातील आर्वी येथे आज जवळपास १०० जणांना कोरोना संसर्ग होऊन यातून ग्रामस्थ बरे झाले आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत दोन ग्रामस्थांचा यामध्ये मृत्यूही झाला आहे. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागाच्या वतीने सर्व सुविधांसह आरोग्यसेवा सुरू आहे. मात्र, शनिवारी सकाळी एका व्यक्तीने प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन कर्मचारी उपस्थित नाहीत, असे म्हणत उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाहेर काढून शिवीगाळ करीत कुलूप ठोकले, असे कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाला निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर, दुपारी ४ वाजता हे कुलूप काढण्यात आले. यावेळेत ५ रुग्ण उपचारासाठी या केंद्रात दाखल झाल्यानंतर त्यांना माघारी फिरावे लागले.
या आरोग्य केंद्रात सर्व कर्मचारी उपस्थित होते. मात्र, कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देत होम क्वारंटाइन असताना, या प्राथमिक आरोग्य केंद्राला शनिवारी ५ तास कुलूप ठोकले. याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली.
- कविता यादव, वैद्यकीय अधिकारी
या आरोग्य केंद्रात अनेक वेळा कर्मचारी उपस्थित नसतात. शनिवारी एका रुग्णाला घेऊन या केंद्रात गेल्यानंतर कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास अडथळे निर्माण झाले. त्यामुळे या केंद्राला कुलूप ठोकून निषेध केला.