घरफोडी करून टीव्ही, गॅस सिलेंडर टाकी चोरणारा आरोपी जेरबंद

By राजन मगरुळकर | Updated: November 2, 2023 17:33 IST2023-11-02T17:32:45+5:302023-11-02T17:33:14+5:30

आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

Accused who stole TV, gas cylinder tank by burglarizing house, jailed | घरफोडी करून टीव्ही, गॅस सिलेंडर टाकी चोरणारा आरोपी जेरबंद

घरफोडी करून टीव्ही, गॅस सिलेंडर टाकी चोरणारा आरोपी जेरबंद

परभणी : सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ब्राह्मण गल्ली भागामध्ये झालेल्या घरफोडीच्या घटनेत टीव्ही आणि चार गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरणाऱ्या आरोपीस सोनपेठ पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातून हे साहित्य जप्त करण्यात आले. सदरील गुन्हा या आरोपीने इतर दोन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.

बाबुराव वेदपाठक यांनी चोरीच्या प्रकरणात फिर्याद दिली होती. सोनपेठ ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे, पोलीस उपनिरीक्षक अजय किरकन, पोलीस अंमलदार भगवान पवार, भगवान मुंडे, तिडके, शिंदे यांनी या चोरीचा घटनेत तपास करून मिळालेल्या माहितीवरून श्याम महादेव गवारे (१८, रा.लहुजी नगर, सोनपेठ) यास ताब्यात घेतले. आरोपीने इतर दोन साथीदारांच्या मदतीने फिर्यादीच्या घराच्या छतावरून सोडलेल्या मोकळ्या जागेतून आत प्रवेश करून टीव्ही आणि चार गॅस सिलेंडरच्या रिकाम्या टाक्या चोरून नेल्या होत्या.

यामध्ये सदरील आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, याप्रकरणी श्याम महादेव गवारे व सतीश बर्वे आणि अन्य एक विधी संघर्ष बालक या तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक रागसुधा. आर., अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ पोलीस पथकाने केली.
 

Web Title: Accused who stole TV, gas cylinder tank by burglarizing house, jailed