मानवत येथील चोरी प्रकरणातील आरोपीस परभणीत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 14:41 IST2019-01-23T14:40:27+5:302019-01-23T14:41:08+5:30
नथू काळे याच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.

मानवत येथील चोरी प्रकरणातील आरोपीस परभणीत अटक
परभणी : मानवत पोलीस ठाण्यात चोरीच्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २२ जानेवारी रोजी अटक केली आहे.नथू अण्णा काळे (४०, रा.तांबसवाडी, ता.मानवत) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
नथू काळे याच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा घडल्यापासून तो फरार होता. स्थागुशाच्या पथकाने आरोपीची माहिती काढून त्यास सापळा लावून अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीर फारुकी, अरुण कांबळे यांनीही कारवाई केली.