सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा फरार आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 12:42 IST2018-11-10T12:40:33+5:302018-11-10T12:42:05+5:30
परवेज खान रफिक खान पठाण (22) असे आरोपीचे नाव असून तो 7 दिवसांपासून फरार होता.

सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा फरार आरोपी अटकेत
परभणी : बोरी येथील एका सहा वर्षाच्या बालिकेवर अमानुषपणे बलात्कार करणाऱ्या फरार आरोपीस पोलिसांनी गुरुवारी रात्री जिंतूर येथून अटक केली. परवेज खान रफिक खान पठाण (22) असे आरोपीचे नाव असून तो 7 दिवसांपासून फरार होता.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बोरी येथील एका सहा वर्षीय मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना 1 नोव्हेंबर रोजी घडली होती. घटनेपासून नराधम आरोपी फरार होता. यानंतर जिल्हाभर याचे पडसाद उमटेल आणि आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी जोर धरू लागली.
आरोपीच्या अटकेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत यांनी सहा पथके स्थापन करून तपास सुरु केला होता. याच दरम्यान पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या पथकाला आरोपी जिंतूर येथे असल्याची माहिती मिळाली. यावरून गुरुवारी रात्री 10.30 वाजता पोलिसांनी त्याला अटक केली.