परभणी जिल्ह्यात वसमत रस्त्यावर अपघात; तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:24 IST2019-05-09T00:23:51+5:302019-05-09T00:24:19+5:30
शहरातील वसमत रोडवरील असोला पाटीजवळ जीप आणि कारचा अपघात होऊन त्यात तीन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना ८ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली़

परभणी जिल्ह्यात वसमत रस्त्यावर अपघात; तीन जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील वसमत रोडवरील असोला पाटीजवळ जीप आणि कारचा अपघात होऊन त्यात तीन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना ८ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली़
या संदर्भात माहिती अशी, एमएच २६ एके-४६३ या क्रमांकाची कार वसमतकडून परभणीकडे येत होती़ तर एमएच २२ एच-३२९९ या क्रमांकाची जीप परभणीहून वसमतकडे जात होती़ असोला पाटीजवळील धामोडा पुलाजवळ या दोन्ही वाहनांची धडक झाली़ त्यात दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे़
दरम्यान, अपघाताची घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धावपळ केली़ या अपघातात तीन प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे़ त्यांची नावे मात्र समजू शकली नाहीत़ या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता़ परभणी-वसमत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत़ हे खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात वाढत आहेत़