दिशादर्शकाअभावी पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST2021-04-04T04:17:37+5:302021-04-04T04:17:37+5:30
पूर्णा उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष राठोड हे गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एमएच १२ पीटी ५७१२ या वाहनाने गस्त ...

दिशादर्शकाअभावी पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाला अपघात
पूर्णा उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष राठोड हे गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एमएच १२ पीटी ५७१२ या वाहनाने गस्त घालत होते. जिल्हा चेकिंग ड्युटी करीत असताना पूर्णा ते चुडावा या रस्त्यावर नऱ्हापूर रस्त्यावर नालापुलाजवळ पुलाचे काम सुरू आहे. काही भागात रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे तर काही भागात अपूर्ण आहे. अशी परिस्थती असताना या भागात दिशादर्शक फलक लावणे आवश्यक होते. मात्र, हे फलक लावले नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी सुभाष राठोड यांची गाडी नऱ्हापूर पुलावर जाऊन आदळली. यात गाडीचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच सुभाष राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा रसत्याचे काम करणारे कंत्राटदार, अभियंता, सुपरवायझर आणि कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पंडित तपास करीत आहेत.