अपघात की घातपात? सेलूत रेल्वेरुळावर मुलीचा मृतदेह आढळला

By ज्ञानेश्वर भाले | Updated: July 8, 2023 12:38 IST2023-07-08T12:37:22+5:302023-07-08T12:38:05+5:30

मुलीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

Accident or murder? A girl's body was found on the railway tracks in Selu | अपघात की घातपात? सेलूत रेल्वेरुळावर मुलीचा मृतदेह आढळला

अपघात की घातपात? सेलूत रेल्वेरुळावर मुलीचा मृतदेह आढळला

- रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (जि.परभणी) :
शहरापासून काही आंतरावरील रेल्वे पटरीच्या रुळामध्ये शनिवारी सकाळी साडेसहाला मुलीचा मृतदेह आढळला. सेलू पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. 

रवळगाव शिवारातील सेलू ते सातोना रेल्वे ट्रॅकवर पोल नंबर २४५/० या ठिकाणी एक मुलगी शनिवारी सकाळी धावणाऱ्या मालगाडीची धडक लागून मयत झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. रेल्वे प्रशासनाने ही बाब सेलू ठाण्यात कळवली. त्यानंतर पो.नि. समाधान चवरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांचा घटनास्थळी पंचनामा केला. 

दरम्यान, या मुलीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय सेलूत आणण्यात आला आहे. ओळख पटविण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. मयत मुलीला डोक्या व्यतिरिक्त कुठेही मार नाही. त्यामुळे हा घातपात असू शकतो का..?आणखी काही प्रकार आहे..? या दृष्टीने पोलीस माहिती घेत आहेत. कारवाई पूर्ण झाल्यानंतर माहिती दिली जाईल असे पो.नि. समाधान चवरे यांनी सांगितले आहे.

Web Title: Accident or murder? A girl's body was found on the railway tracks in Selu