ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 16:21 IST2023-02-24T16:19:34+5:302023-02-24T16:21:18+5:30
पाथरी- आष्टी रस्त्यावरून जात असताना हदगाव पाटीजवळ झाला अपघात

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू
पाथरी ( परभणी ) : पाथरी - आष्टी रस्त्यावर हदगाव बु पाटीजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना 23 फेब्रुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे.
पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील अशोक मारुती आव्हाड ( 55 ) हे दुचाकीवरून ( क्रमांक एम हेच 20 डीबी 35 85 ) देवेगाव येथून पाथरगव्हाणकडे प्रवास करत होते. पाथरी- आष्टी रस्त्यावरून जात असताना हदगाव पाटीजवळ ट्रॅक्टरने आव्हाड यांच्या दुचाकीला धडक दिली. यात अशोक आव्हाड यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक मात्र फरार झाला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.