शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर उभ्या बेवारस टेम्पोने घेतला तरुणाचा बळी; पाथरी-आष्टी रस्त्यावर पहाटे अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 16:29 IST

पाथरी ते आष्टी रस्त्यावर सारोळा पाटीजवळ उभ्या टेम्पोवर दुचाकी पाठीमागून धडकुन अपघात

- विठ्ठल भिसे 

पाथरी : पाथरी ते आष्टी रस्त्यावर सारोळा पाटीजवळ रस्त्यावर उभ्या बेवारस टेम्पोला पाठीमागून दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे साडेबाराच्या सुमारास घडली. सुरेश भागवत शिंदे ( २७) असे मृताचे नाव आहे.

पाथरी तालुक्यातील हदगाव बुद्रुक येथील तरुण सुरेश भागवत शिंदे परभणी येथे वेअर हाऊसवर कामाला होता. तो दररोज हदगाव बुद्रुक येथून परभणी येथे कामाला जात असे. मंगळवारी रात्री उशिरा सुरेश परभणी येथून काम आटोपून गावाकडे दुचाकीवरून परत निघाला. दरम्यान, पाथरी ते आष्टी रस्त्यावर सारोळा बुद्रुक पाटीजवळ रस्त्यावर शॉर्ट सर्किटमुळे जळालेला अपघातग्रस्त टेम्पो ( क्र. DL-1-GE 0935) उभा होता.  पहाटे एक वाजेच्या दरम्यान टेम्पोचे कोणतेही इंडिकेटर सुरू नसल्याने सुरेशची दुचाकी टेम्पोला पाठीमागून धडकली. यात सुरेश शिंदेच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला पाथरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून सुरेश यास मृत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास साहेब पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट करत आहेत. 

रस्त्यावर उभ्या बेवारस टेम्पोने घेतला तरुणाचा बळी पाथरी ते आष्टी रस्त्यावर सारोळा पाटीजवळ दोन दिवसांपूर्वी आयशर टेम्पो शॉर्टसर्किटमुळे जळाल्याची घटना घडली होती. टेम्पो जळल्यानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला. टेम्पो रस्त्यामध्येच लावण्यात आला होता. टेम्पोचा रिफ्लेक्टर किंवा इंडिकेटर चालू नव्हते. त्यामुळे अपघातातील दुचाकीस्वाराला रस्त्यावरील टेम्पो लक्षात आला नाही. त्यामुळे रस्त्यावर उभ्या बेवारस टेम्पो तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघातDeathमृत्यू