An 8-year-old girl raped by 17 yr boy in Gangakhed | तोंडावर चिकटपट्टी बांधून आठवर्षीय बालिकेवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार
तोंडावर चिकटपट्टी बांधून आठवर्षीय बालिकेवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार

ठळक मुद्देदिवाळी सुट्या दरम्यान केला अत्याचार

गंगाखेड (जि. परभणी) :  दिवाळीच्या सुटीसाठी आजोबांसोबत गावी आलेल्या एका आठवर्षीय बालिकेवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना गंगाखेड तालुक्यातील एका तांड्यावर घडली आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन २ डिसेंबर रोजी रात्री उशिरा आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

पतीसोबत पटत नसल्याने एक विवाहिता आठ वर्षांच्या बालिकेसह चार वर्षांपासून माहेरी आई-वडिलांसोबत रहात होती. १९ आॅक्टोबर रोजी फिर्यादी महिलेचे आई-वडील दिवाळी सणासाठी तालुक्यातील एका तांड्यावर आले होते. त्यावेळी या महिलेची आठ वर्षांची बालिकाही आजी-आजोबांसोबत आली होती. १९ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात तांड्यावरीलच एका १७ वर्षीय मुलाने आठ वर्षीय बालिकेला संत्रा गोळीचे अमिष दाखवून घरातून बोलावून घेतले. तिच्या तोंडावर चिकटपट्टी बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. कोणाला सांगितले तर मारुन टाकीन, अशी धमकी दिली. 

दिवाळी सुट्या संपल्यानंतर बालिका आईकडे परतली. तेव्हा तिने या घटनेची माहिती आईला सांगितली. त्यानंतर २ डिसेंबर रोजी रात्री उशिरा पीडित बालिकेच्या आईने गंगाखेड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरुन अल्पवयीन मुलाविरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेश राठोड तपास करीत आहेत.

Web Title: An 8-year-old girl raped by 17 yr boy in Gangakhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.