दुचाकीच्या धडकेत ७० वर्षीय महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 14:34 IST2020-08-05T14:32:50+5:302020-08-05T14:34:18+5:30
रस्त्याने घरी जात असताना त्यांना एमएच २२ एएस-७०६७ या क्रमाकांच्या दुचाकीचालकाने जोराची घडक दिली.

दुचाकीच्या धडकेत ७० वर्षीय महिलेचा मृत्यू
परभणी: रस्त्याने जाणाऱ्या एका ७० वर्षीय महिलेस दुचाकीस्वाराने दिलेल्या घडकेत या महिलेचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना परभणी शहरात मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास पाथरी रोड भागात घडली. याबाबत दुचाकीचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, शहरातील भारत नगर येथील मदिना बी शेख यासीम (७०) मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास रस्त्याने घरी जात असताना त्यांना एमएच २२ एएस-७०६७ या क्रमाकांच्या दुचाकीचालकाने पाठीमागून जोराची घडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर दुचाकीचालक वाहन जागेवरच वाहन टाकून पळून गेला.
यावेळी त्यांचा नातू गफार नसीबखाँ पठाण हा घरी जात होता. त्याच्या निदर्शनास ही बाब आली. त्याने तातडीने मदिना बी शेख यासीम यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा दुपारी ४ च्या सुमारास मृत्यू झाला. याबाबत त्यांचा नातू गफार नसीबखाँ पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच २२ एएस-७०६७ क्रमांकाच्या दुचाकीविरोधात निष्काळीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.