दैठणा (जि. परभणी) : शेजा-यांच्या त्रासाला वैतागून एका ५१ वर्षीय महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री परभणी तालुक्यातील दैठणा येथे घडली. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.दैठणा येथील शेतकरी पंडितराव दत्तराव कच्छवे तसेच गोविंद ज्ञानोबा कच्छवे व इतरांमध्ये शेतातील रस्त्यावरून वाद सुरू होता. याप्रकणी पंडित कच्छवे यांनी दैठणा पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. १९ आॅक्टोबर रोजी पंडितराव कच्छवे व त्यांची पत्नी पद्ममीनबाई हे शेतामध्ये सोयाबीन काढण्यासाठी गेले होते. यावेळी गोविंद कच्छवे व इतरांनी त्यांचा रस्ता आडविल्याने त्यांच्यात जोराचे भांडण झाले. तसेच पंडितराव कव्छवे व पद्मीनबाई यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. शेजा-यांच्या नेहमीच्याच त्रासाला वैतागून पद्ममीनबाई यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पंडितराव कच्छवे यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे़
शेजा-यांच्या त्रासाला वैतागून ५१ वर्षीय महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 06:35 IST