पाथरीमध्ये पोलिसांच्या छाप्यात ४ लाख ८० हजाराचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 14:56 IST2021-03-30T14:55:41+5:302021-03-30T14:56:28+5:30

स्थानिक गुन्हे शाखा आणि पाथरी पोलिसांची संयुक्त कारवाई

4 lakh 80 thousand gutka seized in police raid in Pathri | पाथरीमध्ये पोलिसांच्या छाप्यात ४ लाख ८० हजाराचा गुटखा जप्त

पाथरीमध्ये पोलिसांच्या छाप्यात ४ लाख ८० हजाराचा गुटखा जप्त

ठळक मुद्देएक आरोपीला अटक तर दोन फरार 

पाथरी : स्थानिक गुन्हा शाखा आणि  पाथरी पोलिसांच्या पथकाने सोमवारी पहाटे केलेल्या  संयुक्त कारवाईमध्ये तब्बल 4 लाख 80 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत. 

पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरात गुलशन नगर भागात  एका ठिकाणी अवैधरीत्या गुटखा साठा करण्यात आल्याची माहिती रात्रीच्या गस्तवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांना मिळाली. यावरून सोमवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक सोमवंशी यांच्या समवेत पोलीस जामदार मनोज गजभार, आलिम शेख, संजय चव्हाण, मोकाटे आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, पोलीस उप निरीक्षक विश्वास खोले,  पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्र, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, विष्णू भिसे, अझहर पटेल, दीपक मुंडे यांनी गुलशन नगर भागात धाड टाकली. यात तब्बल ४ लाख ८० हजार २४० रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. 

तपासात तीन आरोपींनी चोरट्या विक्रीसाठी हा साठा केला होता असे स्पष्ट झाले. आवेज खान अलिदाद खान, परवेज खान अलिदाद खान, सदाम चाऊस ( तिघे  रा.पठाण मोहल्ला, पाथरी) अशी आरोपींची नावे आहेत. यातील एका आरोपीस अटक करण्यात आले आहे तर दोघे फरार आहेत. याप्रकरणी  पोना महेश गजभार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि प्रवीण सोमवंशी हे करित आहेत.

Web Title: 4 lakh 80 thousand gutka seized in police raid in Pathri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.