ऑक्सिजनचे ३८ तर व्हेंटिलेटरचा फक्त १ बेड शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST2021-05-08T04:17:41+5:302021-05-08T04:17:41+5:30
कोरोनाबाधित रुग्णांना उपचार वेळेत मिळावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू आणि विनाऑक्सिजन ...

ऑक्सिजनचे ३८ तर व्हेंटिलेटरचा फक्त १ बेड शिल्लक
कोरोनाबाधित रुग्णांना उपचार वेळेत मिळावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू आणि विनाऑक्सिजन बेडची माहिती देण्यास शुक्रवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ पर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध २१५ ऑक्सिजन बेडपैकी एकही बेड उपलब्ध नाही, तर विनाऑक्सिजनच्या १०२ पैकी १५ बेड शिल्लक आहेत. व्हेंटिलेटरच्या २ व आयसीयूच्या १० पैकी एकही बेड सध्या शिल्लक नाही. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीतील २०९ ऑक्सिजन बेडपैकी २३ बेड शिल्लक आहेत. तर, विनाऑक्सिजनचे ७२ पैकी ८ बेड शिल्लक आहेत. व्हेंटिलेटरचा १ तर आयसीयूच्या २४ पैकी एकही बेड शिल्लक नाही. आयटीआय हॉस्पिटल येथे ११६ ऑक्सिजन बेडपैकी ८ बेड शिल्लक आहेत. तसेच विनाऑक्सिजनचे २० पैकी ७ बेड शिल्लक आहेत. तसेच येथे व्हेंटिलेटरचा येथे एकही बेड उपलब्ध नाही. आयसीयूचा २४ पैकी एकही बेड शिल्लक नाही.
अक्षदा व रेणुका मंगल कार्यालयांत साधे बेड उपलब्ध
शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात विनाऑक्सिजनच्या १८० पैकी २०, तर रेणुका मंगल कार्यालयात २५३ पैकी १४९ विनाऑक्सिजन बेड शिल्लक आहेत.
आयसीयूचा एकही बेड नाही शिल्लक
परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, आयटीआय रुग्णालय आणि जिल्हा परिषद रुग्णालय या ३ रुग्णालयांत आयसीयूचे एकूण ३४ बेड आहेत. सध्या यापैकी एकही बेड शिल्लक नाही.
९७० रुग्णांवर उपचार सुरू
शहरातील ३ प्रमुख शासकीय रुग्णालयांत सध्या ऑक्सिजन बेडवर ५०२, व्हेंटिलेटर बेडवर ६, आयसीयूमध्ये ३४ आणि विनाऑक्सिजन बेडवर ४२८ असे एकूण ९७० रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.