जिल्ह्यात ३६७ रुग्ण; सहा जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:14 IST2021-04-03T04:14:25+5:302021-04-03T04:14:25+5:30
दोन आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद होत असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही ...

जिल्ह्यात ३६७ रुग्ण; सहा जणांचा मृत्यू
दोन आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद होत असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही चिंतेचे ठरत आहे. २ एप्रिल रोजी आरोग्य विभागाला २ हजार १३१ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २९० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे रॅपिड टेस्टच्या २०६ अहवालांमध्ये ७७ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे ३ पुरुष, १ महिला आणि खासगी रुग्णालयातील २ पुरुष अशा ६ जणांचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात एकूण १५ हजार २२४ रुग्णसंख्या झाली आहे. त्यापैकी १२ हजार २१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ४२९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, सध्या २ हजार ५८१ रुग्ण उपचार घेत आहेत. आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २८० एवढी आहे. २ हजार ८९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये म्हणजे घरीच उपचार घेत आहेत.
रुग्णालये फुल्ल
जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालय बरोबरच खासगी रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण असल्याने रुग्णालये फुल्ल झाली आहेत. ऑक्सिजन बेडसाठी ही रुग्णांना शोधा शोध आणि धावाधाव करावी लागत आहे. जिल्ह्यामध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याची माहिती प्रशासन देत असले तरी प्रत्यक्षात ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दररोज किती ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत आणि कुठे आहेत, याची माहिती रुग्णांसाठी जाहीर करावी, अशी मागणी होत आहे