शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार शेतकरी कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST

जिंतूर : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील ३५ हजार ३९१ शेतकऱ्यांच्या खात्यावर २०२ कोटी ६९ लाख रुपये ...

जिंतूर : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील ३५ हजार ३९१ शेतकऱ्यांच्या खात्यावर २०२ कोटी ६९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे हे शेतकरी कर्जमुक्त झाले असल्याची माहिती सहायक निबंधक आसाराम गुशिंगे यांनी दिली.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या. यामध्ये ४० हजार ४६३ शेतकऱ्यांपैकी ३८ हजार १९१ शेतकऱ्यांचा समावेश होता. यातील ३६ हजार ६४४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाचे काम पूर्ण केले आहे. त्यातील ३५ हजार ३९१ शेतकऱ्यांच्या खात्यावर २०२ कोटी ६९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे हे ३५ हजार ३९१ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील एक हजार ५४८ शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र असतानाही त्यांनी आधार प्रमाणिकरण करून घेतलेले नाही. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे योजनेसाठी पात्र प्रत्येक लाभार्थींनी आधार प्रमाणिकरण करून घेणे बंधनकारक आहे. या संदर्भात अनेकवेळा सुचित करण्यात आले असल्याचे सहायक निबंधक गुशिंगे यांनी सांगितले. कर्जमुक्त ठरलेल्या लाभार्थींना खरीप हंगामात बँकांकडून नव्याने कर्जही देण्यात आले असल्याचे ते म्हणाले. ज्यांचे प्रमाणिकरण झाले नाही, त्यांना मात्र नवीन कर्ज मिळण्यास अडचण येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

४७२ शेतकऱ्यांच्या तक्रारी

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत तालुक्यातील ४७२ शेतकऱ्यांनी विविध प्रकरणांतर्गत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार संबंधित समितीकडे २२ तक्रारी प्रलंबित आहेत, तर १४५ शेतकऱ्यांच्या तक्रारीचे तहसीलदारांकडून निवारण करण्यात आले असल्याची माहिती सहायक निबंधक गुशिंगे यांनी दिली.