परभणी जिल्ह्यात २६३ बाधितांची नोंद; ६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:18 IST2021-03-27T04:18:01+5:302021-03-27T04:18:01+5:30
परभणी : जिल्ह्यात शुक्रवारी २६३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ६ जणांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात ...

परभणी जिल्ह्यात २६३ बाधितांची नोंद; ६ जणांचा मृत्यू
परभणी : जिल्ह्यात शुक्रवारी २६३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ६ जणांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्यात गेल्या ५ दिवसात पहिल्यांदाच रूग्णसंख्येत शुक्रवारी घट झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी जिल्ह्यात २६३ कोरोनाबाधित रूग्ण आढळले. त्यातील तब्बल १६७ रुग्ण हे परभणी शहर व तालुक्यात आढळले आहेत. याशिवाय सेलू तालुक्यात २७, पूर्णा तालुक्यात १५, जिंतूर तालुक्यात २२, गंगाखेड तालुक्यात १०, पाथरी, मानवत तालुक्यात प्रत्येकी २, सोनपेठ तालुक्यात ४ तर पालम तालुक्यात ६ रुग्ण आढळले आहेत. याव्यतिरिक्त हिंगोली, वाशिम जिल्ह्यातील रुग्णांची नोंद परभणीत झाली आहे तसेच परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणारा १ पुरूष व २ महिला आणि खासगी रुग्णालयात उपचार घेणारा १ पुरूष व २ महिला अशा ६ जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. कोरोनावर मात केल्याने २५१ जणांना रु्ग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १२ हजार २५८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील १० हजार ६२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ३७५ जणांचा कोरोनामुळे मूत्यू झाला आहे. सद्यस्थितीत १ हजार २६० रुग्णांवर विविध आरोग्य संस्थांमध्ये उपचार सुरु आहेत.