जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी २६३ खाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:18 IST2021-04-04T04:18:05+5:302021-04-04T04:18:05+5:30
८७१ नागरिकांची शनिवारी तपासणी परभणी : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढविल्या आहेत. शनिवारी दिवसभरात ८७१ नागरिकांची आरटीपीसीआर ...

जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी २६३ खाटा
८७१ नागरिकांची शनिवारी तपासणी
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढविल्या आहेत. शनिवारी दिवसभरात ८७१ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात ४८, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १०९, परभणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ३८, गंगाखेड तालुक्यात १७०, पूर्णा १७०, सोनपेठ १३५, पाथरी ७६, मानवत ७० आणि जिंतूर तालुक्यामध्ये २२ जणांची चाचणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत १ लाख ६१ हजार अहवाल निगेटिव्ह
परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या एकूण तपासण्यांमध्ये १ लाख ६१ हजार ९६५ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आरोग्य विभागाने आरटीपीसीआरच्या साह्याने १ लाख ८ हजार ७२७ आणि रॅपिड टेस्ट साह्याने ६९ हजार ५७० नागरिकांची आतापर्यंत तपासणी केली आहे. त्यात ५९४ नागरिकांचे अहवाल अनिर्णायक असून, १४० नागरिकांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेने नाकारले आहेत.