पूर्णा तालुक्यातील २१४ ग्रामपंचायत सदस्य जात वैधता प्रमाणपत्रा अभावी धास्तीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 17:49 IST2018-09-12T17:48:31+5:302018-09-12T17:49:23+5:30
६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींची यादी पूर्णा तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली.

पूर्णा तालुक्यातील २१४ ग्रामपंचायत सदस्य जात वैधता प्रमाणपत्रा अभावी धास्तीत
पूर्णा (परभणी) : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींची यादी पूर्णा तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली. यामुळे तालुक्यातील २१४ ग्रामपंचायत सदस्य धास्तीत आहेत.
तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका २०१५ व २०१७ या कालावधीत दोन टप्प्यात झाल्या. पहिल्या टप्प्यात २१४ सदस्य राखीव जागांवर निवडून आले यातील ५९ सदस्यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्याचा आता सादर केले. यातील १६५ सदस्यांनी अद्याप प्रमाणपत्र सादर केले नाही. दुसऱ्या टप्प्यात राखीव जागांवर निवडून आलेले ५२ सदस्य आहेत. यातील केवळ ३ सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले आहे. यामुळे दोन्ही टप्प्यातील मिळून २१४ सदस्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र सादर केले नाही. तहसीलदार श्याम मंदनूरकर यांनी या सदस्यांची यादी जिल्हाधिकारी यांना नुकतीच सादर केली आहे. यामुळे या सदस्यांमध्ये पुढील कारवाई बाबत धास्ती आहे.