टेम्पो- दुचाकीच्या धडकेत २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू ; तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 20:32 IST2023-03-14T20:32:34+5:302023-03-14T20:32:50+5:30
पाथरी - माजलगाव महामार्गावर झाला अपघात

टेम्पो- दुचाकीच्या धडकेत २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू ; तिघे गंभीर जखमी
पाथरी ( परभणी) : टेम्पो व दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात दुचाकी वरील २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात पाथरी-माजलगाव महामार्गावर रामपूरी ( खु ) फाटयाजवळ आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास झाला.
मानवत शहरातील शिवाजी नगर येथील रहिवासी धिरज विठ्ठराव माने हे दुचाकीवरून आरती दत्ता माने (३०), यशश्री लक्ष्मण माने ( १०) आणि दोन वर्षीय बालक समर्थ दत्ता माने यांच्यासह माजलगावहून पाथरीकडे येत होते. दरम्यान, रामपुरीजवळ पाथरीकडून माजलगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोसोबत दुचाकीची धडक झाली. या अपघातात समर्थ हा दोन वर्षांचे चिमुकला जागीच ठार झाला. तर धिरज माने , आरती माने, यशश्री माने हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना अधिक उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.