सोनपेठमध्ये घर कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 15:07 IST2019-10-28T15:02:19+5:302019-10-28T15:07:02+5:30

सोनपेठ शहरातील देवीमंदिर परिसरात सोमवारी (28 ऑक्टोबर) पहाटे घर कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

2 killed in wall collapse in sonpeth parbhani | सोनपेठमध्ये घर कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

सोनपेठमध्ये घर कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

सोनपेठ - सोनपेठ शहरातील देवीमंदिर परिसरात सोमवारी (28 ऑक्टोबर) पहाटे घर कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण टेकाळे (45) व मंदार टेकाळे (7) या बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे.  मुळचे विटा ता. पाथरी येथील टेकाळे हे सोनपेठ शहरात मागील अनेक दिवसांपासून राहत होते. मागील आठ दिवसांपासून सोनपेठ शहर व परिसरात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. 

सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास घरावरील माळवद व भिंत कोसळली यामध्ये अरुण टेकाळे व त्याचा मुलगा मंदार टेकाळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या पत्नी कस्तुर टेकाळे या जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवाळीसारख्या ऐन सणासुदीच्या दिवसांत अरुण टेकाळे आणि मंदार टेकाळे या बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title: 2 killed in wall collapse in sonpeth parbhani

टॅग्स :Deathमृत्यू